माझा वार्ड माझी जबाबदारी या उपक्रमाचा इतर नगरपरिषदनी आदर्श घ्यावा – खा.ओमराजे निंबाळकर

0
150

उमरगा :-  नगरपरिषदेच्या वतीने माझा वार्ड माझी जबाबदारी हा उपक्रम क्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा आदर्श जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील नगरपरिषदांनी घ्यावा असे काम उमरगा नगर परिषदेच्या वतीने करण्यात आल्यास या उपक्रमाचा उद्देश साध्य होईल असे आवाहन धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  केले.   नगरपरिषद च्या वतीने दिनांक 2 सप्टेंबर पासून शहरातील प्रत्येक भागात माझा वाढ माझी जबाबदारी भावक्रम राबविण्यात सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमाचे उद्घाटन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी, उमरगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, माजी नगरसेवक संजय पवार ,वहाब अत्तार, शिवसेनेचे युवा नेते अजिंक्य बापू पाटील, शेतकरी नेते अनिल जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.    पुढे बोलताना खासदार निंबाळकर म्हणाले की माझा वार्ड माझी जबाबदारी हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता शहरातील प्रत्येक नागरिकांनी  हे काम इतरांचे नसून माझेच आहे.या भूमिकेतून जबाबदारी घेतल्यास  काही कालावधी नंतर हा उपक्रम यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही.आणि याचा आदर्श जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील नगरपरिषद घेतील याकरिता चांगले काम करावे असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उमरगा नगरपरिषद चे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांना तसेच त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांना केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषद चे लेखापाल कृष्णा काळे, संगणक अभियंता महेश शिंदे,कार्यालय अधीक्षक  प्रसाद माळी, पाणी पुरवठा अभियंता गणेश पुरी, प्रशासकीय अधिकारी मुसा मुबारक, विशाल माळी, ईरफान शेख, रमेश हजारे, विकास दनाने, शेषेराव भोसले, मंजुर शेख, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड. एस. पी. इनामदार यांनी केले सुधाकर पाटील यांनी आभार व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here