उमरगा :– तालुक्यातील मुळज येथील कै.प्रा.विवेक बाबुराव झंपले यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने मुळज येथील जि.प.प्रा. शाळा येथे दहावीतील विद्यार्थ्यांना बक्षीसाचे वितरण करुन त्यांची पुण्यतिथी अनोख्या उपक्रमाने साजरी करण्यात आली.बक्षीस वितरणाचा लाभ दहावीत प्रथम क्रमांक आलेल्या कु. सय्यद अल्फिया जावेद यास ट्रॉफी, रोख रक्कम 3001/- रुपये, द्वितीय कु. तृप्ती बाळू सुर्यवंशी यास ट्रॉफी,रोख रक्कम 2001/- रुपये, तृतीय कु.सानिया मोहन चंडकापूरे यास ट्रॉफी,रोख रक्कम 1001/- रुपये मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच शिवकन्या महेश शिंदे,तर प्रमुख उपस्थिती शालेय समितीचे अध्यक्ष संजय मुगळे, मु.अ. जाधव,माजी प्रा. बाबुराव झंपले, संजय भोसले, सुधाकर चव्हाण, मधुकर चव्हाण, केरनाथ माडजे, वामन बिराजदार, शंकर दिवटे, संजय घोटणे,दाजी काका,श्रीशैल तूकशेट्टी,व्यंकट दंडगुले आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी कै.प्राध्यापक विवेक यांच्या बाबतीत तेलंग, पत्रकार शंकर बिराजदार, विजय भोसले यांनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या आठवणी ना उजाळा देऊन त्यांना अभिवादन करण्यात आले तर गायकवाड यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर आभार विजय भोसले यांनी मानले.


