गुंजोटी :- येथील श्रीकृष्ण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या धाराशिव जिल्हा युवक महोत्सवात विविध कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करीत आठ पारितोषिके मिळविली. महाविद्यालयाच्या वतीने दि.10 रोजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.लोकवाद्यवृंद (सांधिक) प्रथम, प्रहसन (सांधिक) द्वितीय, शोभायात्रा (सांघिक) द्वितीय, बळिराजा या एकांकिकेच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाकरिता रितेश गायकवाड यास द्वितीय, उत्कृष्ट अभिनय (पुरुष) नागेश सूर्यवंशी द्वितीय, उत्कृष्ट संहिता द्वितीय, एकांकिका (सांघिक) द्वितीय, उत्कृष्ट अभिनय (स्त्री) अनुष्का कोकणे द्वितीय अशी एकूण आठ पारितोषिक मिळविली. उत्तम सादरीकरण करीत विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाकरिता संघ पात्र ठरले आहेत.यात महाविद्यालयातील नागेश सूर्यवंशी, रितेश गायकवाड, स्नेहा औरादे, अनुष्का कोकणे, काव्य माळगे, अपूर्वा माने, समर्थ कुंभार, श्रेयश रेड्डी, ओमकार पाटील, चैतन्य कट्टी, अभिषेक कदम, प्रथमेश भिसे आदित्य कारभारी यांचा समावेश आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा व मार्गदर्शकांचा प्राचार्य डॉ. गुलाब राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संघप्रमुख डॉ. राजाराम निगडे, डॉ. मल्लमा अंबुसे, प्रशिक्षक प्रा. तम्मा शेटगार, रविकुमार धुताडमल, श्याम देशमुख, मोती जेटिथोर यांचे मार्गदर्शन मिळाले. यांच्यासह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.


