उमरगा:- तालुक्यातील पेठसांगवी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आयोजित ग्रामसभेत कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती सहायक कृषी अधिकारी ए.एम. बलसुरे यांनी दिनांक 12 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत माहिती सादर केली. दि. 12 सप्टेंबर रोजी पेठ सांगवी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. सहायक कृषि अधिकारी ए.एम.बलसुरे यांनी सदर ग्रामसभेला उपस्थित राहून कृषी विभागाच्या वतीने विविध योजना ची माहिती दिली. यामध्ये कृषी विभागाच्या वतीने MREGS, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड ,बियाणे ऑनलाईन करणे,महाडीबीटी PMFME व विभागाच्या इतर विविध योजना विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच PMFME योजनेतील उद्योगाची यादी चे वाचन करून ,उपस्थित शेतकरी बांधवांना लाभ घेण्याचे आवाहन केले .यावेळी सरपंच सौ.कौसरबी शब्बीर मुजावर, उपसरपंच सिराज शेख, तंटामुक्ती अध्यक्ष एस.के.सुरवसे ,अमर यमगर, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी,दत्तू राऊत, गिरमल दलाल, शितल कांबळे,ग्राम पंचायत अधिकारी गणेश मानतुटे ,पत्रकार उमेश सुरवसे ,महेबुब पठाण,लक्ष्मण कांबळे,पदाधिकारी ,शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.


