आयुष्याला दिशा देण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांकडेच – आ.प्रविण स्वामी 

0
90

उमरगा : शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात योग्य संस्कार, ज्ञान आणि मूल्ये रुजविण्याचे कार्य शिक्षक करतो. आयुष्याला दिशा देण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांकडेच असते. शिक्षकांचा गौरव करणे आमचे आद्यकर्तव्य असुन ग्रामीण भागाचा उत्कृर्ष झाल्याशिवाय राष्ट्रउभारणी होणार नाही असे मत आमदार प्रविण स्वामी यांनी व्यक्त केले.शहरातील रोटरी क्लबच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उमरगा व लोहारा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधून राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थी व समाज प्रिय शिक्षकांचा गुरुवारी (ता.११) रोजी शहरातील जिल्हा परिषद सभागृहात मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रशिल्प पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत आहे. उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, रोटरीचे अध्यक्ष प्रा.डॉ. धनंजय मेनकुदळे, सचिव प्रा. राजु जोशी, नितीन होळे, मुख्याद्यापक पद्माकर मोरे, माजी मुख्याध्यापक कमलाकर भोसले उपस्थित होते.प्रामाणिक काम ही देशसेवा असून शिक्षक हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत राष्ट्रासाठी सक्षम नागरिक घडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असतो. अशा गुणवंत कर्तृत्वाचा गौरव रोटरी करते हे प्रेरक असल्याचे उपविभागीय अधिकारी  शेवाळे यांनी यांनी सांगितले.यावेळी प्राचार्य संजय अस्वले, प्रा. रवि आळंगे, सौ. कविता अस्वले, मुख्याध्यापक अजित गोबारे, प्रा. युसुफ मुल्ला, कलशेट्टी पाटील, परमेश्वर सुतार, देवप्पा सुर्यवंशी, शमीम पठाण, जुगल खंडेलवाल, धनंजय वेदपाठक, सोमशंकर महाजन, पुष्पलता पांढरे, अनिल मदनसुरे, रणजीत बिराजदार, प्राचार्य शिवानंद दळगडे, डॉ. विक्रम आळंगेकर, शिवकुमार दळवी, रोटरीचे अध्यक्ष प्रा. धनंजय मेनकुदळे यांनी प्रास्ताविक केले. संजय ढोणे यांनी सुत्रसंचलन केले. श्री. जोशी यांनी आभार मानले.

यांचा झाला राष्ट्रशिल्प पुरस्काराने गौरव

नेशन बिल्डर अवार्ड पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे

प्रा.डॉ. संजय दुलंगे (आदर्श महाविद्यालय, उमरगा), प्रमोद मोरे (जि. प. प्रा. शाळा, कुन्हाळी), रमेश भुरे (महात्मा गांधी विद्यालय, केसरजवळगा), रवी पाटील (श्रीकृष्ण विद्यालय, गुंजोटी), सौ.मीनाक्षी जाधव (कुमारस्वामी प्राथमिक विद्यालय,उमरगा), व्यंकट गुंजोटे (भारत विद्यालय, माकणी), गुंडू दूधभाते (ज्ञानेश्वर विद्यालय, तुरोरी), सौं. बबिता महानोर (जि. प. शाळा, करवंजी) तसेच कासय्या स्वामी गुरुजी शिक्षण सेवा पुरस्कार गुरु बिराजदार यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी गौरी आरास स्पर्धेतील ऊज्वला थोरे , तुरोरी (प्रथम), पुष्पा जोगी ,उमरगा (द्वितीय), सुनिता जाधव , गुंजोटी (तृतीय), सागरिका वेदपाठक, सुनिता श्रीमेवार , उमरगा (उत्तेजनार्थ) यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here