जि.प .च्या सायकल बँकेसह , निसर्गप्रेमी मंडळ , क्षयरूण ,आनंदी फांऊडेशनला केले सहकार्य
उमरगा : येथील शीला तुकाराम गायकवाड -सगर सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या स्मृतीशेष शीला गायकवाड -सगर यांच्या स्मरणार्थ दि १५ रोजी जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे सामाजिक उपक्रम दिनाचे आयोजन करण्यात आले होते . याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार,सुभहस्ते वितरण आ .प्रवीण स्वामी,भाजपा नेते शहाजी पाटील, पो.नि.प्रल्हाद सूर्यवंशी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ .उमाकांत बिराजदार, डॉ . ऋतुजा साळुंके, सगर समाज अध्यक्ष ॲड दिलीप सगर , माजी नगरसेवक संतोष सगर , सामाजिक कार्यकर्ते अनिल पप्पू सगर , सुनिल साळुंके, विलास कुलकर्णी , मुख्याध्यापक पद्माकर मोरे , संस्थेचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती .

दि १५ रोजी संपन्न झालेल्या या सामाजिक उपक्रम दिना निमीत्त शीला तुकाराम गायकवाड – सगर सामाजिक संस्थेच्या वतीने उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे उभारण्यात आलेल्या सायकल बँकेला मुलींसाठी पाच सायकल भेट देण्यात आल्या . याशिवाय उमरगा शहरातील वृक्षारोपणासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या निसर्गप्रेमी मंडळाला ट्री गार्डसाठी पाच हजार रुपयाचे आर्थिक सहकार्य मंडळाचे सुशील दळगडे ,सचिन माशाळकर ,महेश कवठे ,गणेश माने , डॉ . तानाजी दुधभाते यांना देण्यात आले . येणेगुर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत क्षयरुग्णांसाठी पोषक आहाराच्या किटचे वितरण करण्यात आले . तर आनंदी फाउंडेशन उमरगाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या निराधार ,मतिमंद रुग्णांच्या सेवेसाठी पाच हजार रुपयाची आर्थिक सहकार्य संस्थेचे अमोल जाधव यांना देण्यात आले .चेन्नई येथे कराटेच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना टी-शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले .समाजाच्या हितासाठी सामाजिक संस्थांनी असे उपक्रम राबवण्याची नितांत गरज असल्याचे मत आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केले तर अध्यक्षीय समारोपात प्रा .सुरेश बिराजदार यांनी शिला तुकाराम गायकवाड सगर सामाजिक संस्थेचे कार्य आदर्श घेण्यासारखे आहे .देशाच्या आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी समाजाभिमुख उपक्रम ही काळाची गरज आहे .असे मत व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव अमोल पाटील यांनी केले .तर आभार सोनाली सगर यांनी मांनले . यावेळी सुभाष गायकवाड ,मारुती पाटील ,डॉ विक्रम आळंगेकर ,शमशोद्दीन जमादार ,भूमिपुत्र वाघ ,धीरज बेळंबकर,रफिक शेख ,प्रताप राठोड , अनिल काळदाते , शंतनु सगर ,बाबुराव सगर ,रूपसिंग सगर ,दिलीप सगर ,दिलीप सगर ,मयूर सगर , फारुक शेख ,महादू गायकवाड ,गुंडू सगर ,ऋषी सुरवसे,सुवर्णा गायकवाड ,अपर्णा गायकवाड , अलका गायकवाड सारिका जाधव ,वंदना सगर ,संध्या सगर ,उषा सगर ,राऊ भोसले ,सुदेवी सगर , सुमन सगर आदी सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होतो .


