उमरगा:- तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे, धनंजय बेडदुर्गे, रमण भोकरे, प्राचार्य महेश कदारे, डॉ. स्नेहल धर्माधिकारी, प्रा.अल्वीन काळे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नाट्य व भाषणे सादर केली. यावेळी प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.श्रीकृष्ण मुळे, प्रा.अंकिता यादव, प्रा.चनबस शेटगार, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील, प्रा. किर्ती आर्य, प्रा.प्रशांत वाघमारे, प्रा.शुभम सूर्यवंशी, प्रा.प्रियंका राठोड प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख , प्रा.अविनाश कुंभार, प्रा.शुभांगी बंदीचोडे, प्रा.मोनिका धुरे व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.अंकिता यादव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


