‘राजस्थानी मल्टीस्टेट’चे दोन संचालक अटकेत ; सात दिवसाची पोलीस कोठडी

0
362

उमरगा :– शहरातील राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या शाखेत गुंतवणूक करणा-या ग्राहकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकरणात तालुक्यात

गुन्हे दाखल झाले होते. या संदर्भात दिनांक 17 रोजी धाराशिव जिल्हा आर्थिक गुन्हे शाखा च्या वतीने दोन संचालकांना उमरगा न्यायालयात हजर करण्यात आले दरम्यान या संचालकाला सात दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनवली आहे .

राजस्थान मल्टीस्टेटच्या अमिषाला बळी पडून शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली होती काही कालावधीतच कोठावधी रुपये जमा करून येथील शाखा बंद करणार आली होती यामुळे शहरातील नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्यामुळे संबंधित संचालकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपूर्वी मल्टीस्टेटचे चेअरमन चंदुलाल बियाणे तसेच संचालक यांना अटक करण्यात आले असून, यापैकी दोन संचालकांना नांदेड येथे अटक करण्यात आले होते. संबंधित संचालकांना धाराशिव जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने ताब्यात घेऊन दि. 17 रोजी उमरगा न्यायालय हजर करण्यात आले असता संचालक बद्रीनारायण बाहेती व प्रेमलता बाहेती यांना न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या निमित्ताने धाराशिव जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी जनतेला आव्हान करून सांगितले की खाजगी संस्थेमध्ये आर्थिक व्यवहार करत असताना अथवा आर्थिक गुंतवणूक करत असताना संबंधित मल्टीस्टेट संस्था, सहकारी पतसंस्था, सहकारी बँका इत्यादीची पार्श्वभूमी तपासूनच आर्थिक गुंतवणूक करावी जेणे करून कष्टाच्या पैशाला कोणत्याही प्रकारचे ग्रहण लागणार नाही व आर्थिक नुकसान होणार नाही याची दक्षता जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी घ्यावी अशी आवाहन आर्थिक गुन्हे शाखा च्या पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण?

— राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवी जमा केल्या मात्र, त्यानंतर उमरगा येथील  शाखेसह सर्व शाखा बंद करत संचालकांनी पोबारा केला. कष्टाचा पैसा बुडण्याच्या स्थितीत आल्यानं ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली. दरम्यान, अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह सर्व संचालक मंडळावर ठेवीदारांचे जवळपास ३०० कोटी रुपये बुडवल्या प्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here