धाराशिव :– जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील वाकडी येथे दि. 28 रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माझी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी न्याय हक्क मिळवा आयोजित करण्यात आला आहे.हा मेळावा शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव, निराधार महिला, यांचा बुलंद आवाज माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होणार आहे. तरी शेतकरी ,शेतमजूर बांधव, दिव्यांग बांधव, वंचित निराधार, महिला, विटभट्टी संघटित असंघटित कामगार, कुंभार, चांभार, सुतार, लोहार छोटे मोठे व्यवसायीक, दुधउत्पादक शेतकरी, फळ उत्पादक, ऊस कापूस सोयाबिन उत्पादक शेतकरी यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करु असे म्हणणाऱ्या व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी सरकारने दिलेला शब्द पूर्ण करावा या सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी न्यायहक्क मेळावा दि.28 रोजी सायं .7 वा. वाकडी ता. परंडा येथे होणार आहे. तरी उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे.असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्ष उमरगा तालुक्याचे अध्यक्ष अजिम खजुरे यांनी केले आहे
.


