उमरगा:- येथील विधीज्ञ मंडळाच्या निवडणुकीत सर्व विधीज्ञांनी माझ्यावर मोठा विश्वास ठेवून दि. 23 रोजी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत मला विजयी करण्यात आले असून, हा विजय माझा एकट्याचा नसून सर्व विधीज्ञ यांचा आहे. ज्या कार्यासाठी मला विजयी करण्यात आले आहे. त्या कार्याची संकल्प सिद्धी होईपर्यंत मी कोणाचा ही सत्कार, हारतुरे स्वीकारणार नाही. ज्यादिवशी माझा संकल्प सिद्धीस जाईल त्या दिवशी मोठा स्वाभिमानाने मी आपल्या सर्वांच्या समोर सत्कार स्वीकारेण असा दृढ संकल्प दिनांक 24 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी ऍड. प्रवीण चंद्र तोतला यांनी व्यक्त केला
न्यायालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष माळी बी.जी. हे होते तर याप्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ व माजी अध्यक्ष ऍड. कोथिंबीर,ऍड. दिलीप सगर,ऍड. चिंचोलीकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना ऍड .तोतला म्हणाले की,न्यायालयाकरिता नवीन सुसज्ज इमारत उपलब्ध झाली असतानाही येथील विधीज्ञकरिता असन व्यवस्था, कॅन्टीन ची सोय, पार्किंगची सोय आत्तापर्यंत करण्यात आली नसून जोपर्यंत ही सर्व व्यवस्था करण्यात येणार नाही तोपर्यंत मी कोणत्याही प्रकारचा सत्कार स्वीकारणार नाही.तसेच येथील विधींज्ञ करिता जे जे चांगलं करता येईल ते ते माझ्या कार्यकाळात चांगलं करण्याचा यशस्वी प्रयत्न करेन यासाठी आपणा सर्वांची सहकार्याची गरज आहे. जोपर्यंत सर्वांचं सहकार्य लाभत नाही तोपर्यंत कोणतही कार्य चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या पूर्ण होत नाही. याकरिता आपण सर्वांनी मला ज्याप्रमाणे विजयी करण्याकरिता सहकार्य केला आहात. त्याप्रमाणेच माझा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण होण्याकरिता आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो असे याप्रसंगी ऍड .प्रवीणचंद्र तोतला म्हणाले. दरम्यान विधीज्ञ मंडळाची निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी ऍड .जे. बी. शेख, सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्चना वि. जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले त्यामुळे ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली याबद्दल या दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांचे याप्रसंगी सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड .वर्षा जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार माजी कोषाध्यक्ष ऍड .कृष्णा पाटील यांनी मानले. याप्रसंगी न्यायालयातील विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


