उमरगा:– तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी, च्यावतीने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे उमरगा शहरामध्ये आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष बी.एच.बेडदुर्गे, सचिव डॉ.विजय बेडदुर्गे, डॉ.विजय गायकवाड, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा.धनंजय मेनकुदळे, सचिव राजू जोशी, प्राचार्य महेश कदारे, प्रशांत कुलकर्णी, प्रशांत माने, धनंजय बेडदुर्गे यांची उपस्थिती होती.

मॅरेथॉन स्पर्धेमध्ये उमरगा तालुक्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालयातील 180 जणांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये मुलांमधून प्रथम कु. नामदेव भोसले, कु. अंबादास राठोड द्वितीय व कु.आकाश बनसोडे याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच मुलींमधून प्रथम कु.प्रीती माने, द्वितीय कु.राधीका ममाळे व कु. राजनंदिनी सूर्यवंशी हीने तृतीय क्रमांक मिळवीला. विजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आयोजीत रांगोळी व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच उमरगा शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच फार्मासिस्ट शपथ घेण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.किरण पांचाळ, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.अंकिता यादव, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील, प्रा.किर्ती आर्य, महेश थोरे व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य महेश कदारे, श्रीकांत गावडे यांनी केले व आभार प्रा. अजय बेडदुर्गे यांनी केले.


