उमरगा : धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पुरामुळे नदीवरील, ओढ्यावरील तसेच लहान मोठ्या नाल्यावरील तुंबलेल्या व बंद झालेल्या पुलांची संभाव्य धोका टाळण्यासाठी त्वरीत साफसफाई करावी असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा .सुरेश बिराजदार यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम विभाग यांना निवेदनाद्वारे दि .२५ रोजी दिले आहे .
देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यात मागील १५ ते २० दिवसा पासुन मोठा पाऊस व अतीवृष्टी होत आहे. यामुळे पुर सदृष्य परिस्थिती निर्मान होऊन नदी, ओढे, नाल्याचे अतीरीक्त झालेले पाणी अजुबाजुचे झाडे झुडपे, कचरा मोठ्या प्रमाणात वाहुन नेत आहेत. व हा सर्व कचरा पुलाच्या तोंडावर येऊन अनेक प्रवाह बंद झाले आहेत. गेल्या कांही दिवसापासुन आम्ही पुरग्रस्त गावांची पहाणी करीत असता असे निदर्शनास आले की, अनेक ठिकाणच्या नद्या, नाल्या वरील तसेच ओढ्यावरील पुलाच्या तोडाशी झाडे-झुडपे, पाला पाचोळा व माती येऊन पाणी जान्याचा प्रवाह बाधीत झाल्या मुळे बाजुला असलेल्या जमीनीचे, शेती, पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या लहान मोठ्या पुलावरील अडकलेला कचरा, गाळ व झाडेझुडपे काढणे अत्यावशक आहे. जेनेकरुन प्रवाह मोकळा होईल. येणाऱ्या आठवड्यात परत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तरी पुलाच्या तोंडाशी आलेला कचरा, गाळ तसाच राहील्यास पाण्याच्या प्रवाहाला आडथळा निर्मान होऊन याही पेक्षा मोठ्या प्रमाणात आजुबाजुच्या शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे. व पुलावर भार वाढल्याने लहान पुलेही वाहुन जान्याची दाट शक्यता आहे. आपले हातात मोजकेच दिवस व तास शिल्लक आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरीत दखल घेऊन संबंधीत विभागाला सुचना करावी अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे .यासोबतच प्रा .बिराजदार यांनी आम्ही आमच्या वतीने मशिन लावुन झाडेझुडपे काढण्याचे काम चालु केले असल्याचे एवढे सांगितले आहे .


