उमरगा :– येथील भारत शिक्षण संस्था संचलित, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागाच्या वतीने बसस्थानक येथे दि.25 रोजी स्वच्छता करण्यात आली. भारत सरकार द्वारा आयोजित स्वच्छोत्सव -स्वच्छ व हरित उत्सव , स्वच्छता ही सेवा ही थीम घेऊन एक तास , एक दिवस स्वच्छता करणे ह्या उदेश्याने आवास आणि शहरी मंत्रालयाच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या मध्य सर्व सार्वजनिक,सामाजिक ठिकाणी स्वच्छता करुण स्वच्छतेचा संदेश समाजा पर्यंत पोहचवणे आहे .त्याच अनुषंगाने डीजी एनसीसी कार्यालय दिल्ली द्वारा सर्व राज्यात ज्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय येथे एनसीसी विभाग आहे त्यांना या कार्यक्रमासाठी सामुदायिक योगदानला चालना मिळण्यासाठी हे स्वच्छता मोहीम , रॅली ,श्रमदान, रक्तदान घेण्यात येणार आहेत. यात सर्वांनी निस्वार्थपणे युवकांनी,समाजातील सर्व व्यक्तिनी राष्ट्रनिर्माण करिता योगदान देणे ह्या उद्देश्याने हे अभियान राबविण्यात येत आहे . स्वच्छता महोत्सव अभियाना अंतर्गत आज उमरगा बस स्थानक येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली यावेळी डेपो मॅनेजर पी व्ही कुलकर्णी,वाहतूक निरीक्षक अ ना सरवदे, अदिनाथ बिराजदार , लिपिक व्ही व्ही चव्हाण उपस्थित राहुण स्वच्छता केली .या स्वच्छता अभियानासाठी प्राचार्य डॉ संजय अस्वले ,डॉ विलास इंगळे डॉ पद्माकर पिटले, प्रा गुंडाबापू मोरे , प्रा शैलेश महामुनी श्री नितीन कोराळे , राजकुमार सोनवणे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले .
Home ताज्या बातम्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथील एनसीसी विभागाच्या वतीने बसस्थानक येथे स्वच्छता


