धनगर समाजाचे दिपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ  उमरगा येथे एक दिवशीय लाक्षणीक उपोषण  

0
88

उमरगा:– शहरातील तहसील कार्यालयाच्या समोर उमरगा तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने दि.26 रोजी मराठवाड्यातील जालन्यामध्ये धनगर समाजाचे दिपक बोराडे यांच्या मागील 10 दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ तसेच धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे आदी मागण्या करीता एक दिवशीय लाक्षणीक उपोषण करून तहसिलदार यांना.गौतमीबाई मल्हारराव होळकर बहुउद्देशिय महिला मंडळ उमरगा यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.निवेदनात  महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाची अनुसुचित जमातीच्या (एस.टी.) प्रवर्गात व भारतीय घटनेत 36 क्रमांकावर धनगर ही एकच जमात असून भारतातील इतर राज्यामध्ये अंमल बजावणी झाली  असून,  महाराष्ट्र  अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाजावर फार मोठा अन्याय झालेला असून या साठी मराठवाड्यातील जालन्यामध्ये धनगर समाजाचे दिपक बोराडे मागील 10 दिवसापासून आमरण उपोषणास बसले असून त्यांना पाठींबा देण्यासाठी आज दि. 26 रोजी एक दिवशीय लाक्षणीक उपोषण करीत असून उपोषणकर्त्याच्या खालील मागण्या मान्य कराव्यात. समस्त महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र (एस.टी.) देण्याची तात्काळ अंमल बजावणी करावी., दिपक भाऊ बोराडे यांचे उपोषण सोडवण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. यदा कदाचित काही बरे वाईट झाले तर यास शासन जबाबदार राहिल., शासनाने तात्काळ निर्णय नाही केल्यास विजया दसमी दसऱ्यानंतर लगेचच महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हंटले आहे.निवेदनावर वैजीनाथ कागे संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष,कलिंदा घोडके महिला प्रदेशअध्यक्षा,शिवाजी गावडे, माजी नगसेवक गोविंद घोडके,जालिंदर सोनटक्के,बालाजी घोडके,अरुण गडदे,उत्तमराव घोडके,राम घोडके,खंडू दुधभाते,अर्जुन दुधभाते,गोपाळ घोडके,लक्ष्मी घोडके,सुवर्ण ब्याळे,कविता घोडके,सविता दुधभाते,शोभा हिंडोळे, कोंडाबाई वाघमोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here