लोहारा:– मिशन वात्सल्य समितीचा सास्तूर येथे दि.8 रोजी एकल(विधवा)महिलाच्या व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महामानवाची पूजन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.मेळाव्याला 300 पेक्षा जास्त महिलाची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोहारा तालुक्याचे नायब तहसीलदार रतन काजळे, प्रमुख पाहुणे जगदेव वग्गो, एकल महिलांना भोजनाची व्यवस्था स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे समन्वयक जोशी यांनी केली होती., बायस मॅडम, सास्तुर च्या सरपंच शितलताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. साऊ समितीचे विजय काका जाधव यांनी सर्व शासकीय योजनेची माहिती दिली व एकल महिलांना पुनर्विवाह करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. गट समन्वयक रंजना हसुरे यांनी महिलांना रूढी आणि परंपरा बाजूला सारून महिलांनी पुढे आलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी जगदेव वग्गो यांनी लोहारा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतला एकल महिलांचा मेळावा आयोजित करण्यासाठी सूचना दिल्या जातील असे सांगितले.जोशी यांनी बचत गटाचे फायदे व भविष्य मध्ये करावयाच्या उपायोजनेबद्दल महिलांना मार्गदर्शन केलं.कार्यक्रमाचे अध्यक्ष रतन काजळे यांनी शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असून शासनाच्या नियमाप्रमाणे प्रस्ताव दाखल झाल्यास सर्व मंजुरी करण्यात येईल व सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. कार्यक्रमाला गट समन्वयक लोहारा काशिनाथ पाटील, ज्योती माने, बबीता गुरव, गौरी पंडित, सर्व अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्या, एकल महिला, अपंग, निराधार महिला पुरुष,उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती राजपूत यांनी केले तर आभार विठ्ठल चिकुंद्रे यांनी मानले.


