उमरगा :– धाराशिव जिल्ह्यातील पेठ सांगवी येथील सुपुत्र उद्योग व्यवसाय निमित्त मुंबई येथे स्थायिक झालेले तथा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांच्या वतीने जिल्ह्यातील परंडा, वाशी, कळंब, धाराशिव, उमरगा, लोहारा, तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील अतिवृष्टी ग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे.

मराठवाड्यावर निसर्गाने जणू प्रकोप केला की काय अशी परिस्थिती अतिवृष्टीमुळे निर्माण झाली होती अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतीतील माती खरडून गेली तर काही शेतकऱ्याच्या विहिरी पूर्णतः बुजून गेल्या शेतातील पीक हे पूर्णतः नष्ट झाली शेतकरी उध्वस्त झाला शेतकऱ्याच्या हातात दमडीचाही रुपया ही शिल्लक राहिला नाही. अशा वाईट परिस्थिती तो आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यास मजबूर झालेला असताना अशा अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव महेश देशमुख हे खंबीरपणे विद्यार्थ्यांना साथ देण्यासाठी पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी कवठा जिल्हा परिषद मतदार संघातील साधारण 14 ते 15 गावातील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, पेन ,पेन्सिल, कंपास आधी प्रकारचे शालेय साहित्य देऊ केले. यामुळे अतिवृष्टीमुळे संकटात अडकलेल्या व शैक्षणिक साहित्याची टंचाई असलेल्या विद्यार्थ्यांना खूप मोठा अनमोल असा आधार मिळाला. ज्याच्यामुळे त्यांच्या शैक्षणिक वर्षांमध्ये खूप मोठी मदत झाली इतक्या सढळ हाताने मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व शेतमजूर यांच्या भेटी घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना मदतीचा हात देऊन,कळंब ,भुम, धाराशिव, लोहारा, उमरगा, पंरडा आदी तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकरी व शेतमजूर यांच्या भेटी घेऊन त्याचे झालेले नुकसान शासनाने भरपाई पोटी द्यावे या साठी तहसिलदार तसेच त्या गावचे सरपंच,ग्रामसेवक,तलाठी , गटविकास अधिकारी यांच्या शी संपर्क करून संबंधित शेतकऱ्याच्या शेतीचा पंचनामा करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले असेल तर त्यांचे कडे कोणी लवकर लक्ष देणार नाही.म्हणून त्या विद्यार्थींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व शिक्षणा पासून वंचित राहु नये या साठी आवश्यकता असेल तेथे इतर मद्दती सह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय युवक सचिव महेश देशमुख यांनी केला असून,उमरगा तालुक्यातील कवठा ,पेठसांगवी,नाईचाकुर, बाबळसुर सावळसुर,चिरेवाडी,भगतवाडी,मातोळा,बोरी नारंगवाडी कोळेवाडी,आदी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय युवक सचिव महेश भैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यातील युवक जिल्हाध्यक्ष गणेश पवार,उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष हाणमंत सांगवे, पेठ सांगवी येथील शालेय समितीचे माजी अध्यक्ष अहमद तांबोळी, ओमकार देशमुख,नवनाथ यमगर, इन्नु शेख,कवठा ग्रामपंचायत चे सदस्य चंद्रकांत जाधव तसेच युवक काँग्रेस चे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत.सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.या वेळी विद्यार्थी यांचा आनंद द्विगुणित झाला असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर हश्य पाहुन मनाला आनंद मिळत असल्याची भावना युवक जिल्हाध्यक्ष गणेश पवार यांनी व्यक्त केले. तसेच शेतकरी व शेतमजूर यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य नाही म्हणून शिक्षणा पासून वंचित राहु नये म्हणून सैदव विद्यार्थ्यांकरीता मद्दतीचा हात पुढे असेल सांगितले आहे.


