उमरगा येथे काव्यांगण दीपोत्सव कवी संमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

0
114

उमरगा :-  काव्यांगण दीपोत्सव तथा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 12 रोजी उमरगा येथे साहित्यिकांच्या तसेच रसिकांच्या उपस्थितीत समाज विकास संस्था सभागृहात थाटात संपन्न झाला. उमरगा, लोहारा तालुक्याचे आमदार  स्वामी यांच्या शुभहस्ते यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून तर संमेलनाध्यक्ष डॉ विजयकुमार कस्तुरे आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.प्रारंभी मंचचे अध्यक्ष विकास राठोड यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर आमदार  स्वामी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,उमरगा शहरात काव्यांगण साहित्य मंच तर्फे विविध क्षेत्रातील म्हणजे साहित्य,शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून काव्य संमेलनाची सुरुवात करून नवीन पायंडा पाडला आहे.त्यामुळे नवोदित कवींना काव्य रचना सादर करण्याची संधी प्राप्त होते.यावेळी आमदार स्वामी यांच्या हस्ते राज्यस्तरीय साहित्यरत्न,आदर्श माता,काव्यरत्न,आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षिका,उत्कृष्ट काव्यसंग्रह,हिरकणी,उत्कृष्ट कादंबरी,आदर्श समाजसेवक,अशा एकूण विविध क्षेत्रातील मान्यवराणा सन्मान चिन्ह,मानपत्र,मानवस्त्र, आणि गुलाब पुष्प देऊन तर ५० निमंत्रित कवींना सन्मानचिन्ह आणि मानपत्र बहाल करून गौरवण्यात आले.दुपारच्या सत्रात काव्यरचना सादर करण्यात आल्या.यावेळी धुळे, जळगाव,लातूर,धाराशिव,नागपूर, अमरावती,अकोला आणि अन्य ठिकाणाहून जवळपास दीडशे हून अधिक साहित्यिक आणि कवींनी हजेरी लावली होती.पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी व्यासपीठावर आमदार प्रवीण स्वामी,संमेलनाध्यक्ष डॉ.विजयकुमार कस्तुरे,काव्यांगण साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष विकास राठोड, तसेच डॉ.संजय राठोड,साहित्यिक, कवी लेखक, एड.शुभदा पोतदार,सुवर्णा पवार,डी व्ही खरात, डॉ बबन महामुनी,सुभाष सोनवणे,प्रा.दिलीप पवार ,अंकुश पडधान आदी मान्यवरांची उपस्थित होती.काव्य संमेलन यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष विकास राठोड यांच्यासह उपाध्यक्ष प्रमोद उबाळे सचिव वृंदा गंभीर कार्याध्यक्ष ज्योती लाभ सेटवर तसेच किशोर पांचाळ,रवीराज राठोड,अशोक चव्हाण,सोपान पवार,के. पी. बिराजदार,आदींनी परिश्रम घेतले तर सूत्र संचालनाची जबाबदारी प्राध्यापक महादेव गपाट यांनी, ग्रामीण कला शेलीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक आणि कवींना मंत्रमुग्ध केले.भूमिपुत्र वाघ यांनी समाज विकास संस्थेचे सांस्कृतिक सभागृह मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करण्यात आले. पुढील काळात काव्यांगणासाठी कायमस्वरूपी हॉल उपलब्ध करून देण्याचीही हमी वाघ यांनी दिली.हा पुरस्कार वितरण सोहळा आणि काव्य संमेलनाच्या संदर्भात परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here