कदेर येथे अतिवृष्टीग्रस्तांना शासनाची मदत 

0
238

उमरगा:–  तालुक्यातील कदेर गावात मागील काही दिवसांपूर्वी सततच्या पावसामुळे खूप मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना शासना मार्फत तात्काळ मदत म्हणून दि.15 रोजी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार गोविंद येरमे यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे युवा नेते शरण पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, जिल्हा परिषद चे माजी सदस्य डॉ.विक्रम जीवनगे,रफिक तांबोळी, योगेश राठोड आदींची उपस्थिती होती.

परतीच्या पावसामुळे ( अतिवृष्टीमुळे) कदेर गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.अनेकांच्या घरात पाणी शिरुन घरातील संसार उपयोगी साहित्याचे खुप मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते,ब-याच घरांची पडझड झाल्यामुळे त्यांचे तात्काळ पंचनामे करण्यात आले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना तात्काळ शासनाची मदत जाहीर करण्यात आली. त्याप्रमाणे दि.15 रोजी संबंधितांना धनांदेशाचे वाटप   उपविभागीय अधिकारी  दत्तू शेवाळे, तहसीलदार गोविंद येरमे, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.याप्रसंगी भाजपाचे युवा नेते शरण पाटील,उमरगा पंचायत समिती माजी सभापती  मदन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. विक्रम जीवनगे,सरपंच सतीश जाधव, धनराज जाधव, सुनील पाटील,संतोष पाटील, यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी, पदाधिकारी, महिला, युवक  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here