उमरगा : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगूल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी, युत्या व आघाड्यांच्या चर्चा, इच्छुकाच्या मुलाखती अशी लगबग सुरु आहे.येथील ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने दि. 16 रोजी विविध पक्ष व सामाजिक संघटनातील नेते व कार्यकर्त्यांची उमरगा शहरातील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. बैठकीत स्वतंत्र व नवा पर्याय निर्माण करण्याबद्दल सर्वांचे एकमत झाले.
सर्व पुरोगामी व संविधानवादी लोकांनी लोकसभा व विधानसभेला महाविकास आघाडीला समर्थन दिले. परंतू, चळवळीतल्या कार्यकर्त्यांची ‘मविआ’ने सातत्याने उपेक्षा केल्याने अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. अशा परिस्थितीत पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांना गृहीत धरले जाणार असेल तर मग स्वतंत्रपणे निवडणूकीच्या राजकारणात उतरावे लागेल असा सूर बैठकीतून निघाला. या बैठकीस ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, वंचित बहुजन आघाडी, आर पी आय (आठवले गट), संभाजी ब्रिगेड, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा), छावा संघटना इत्यादी पक्ष व संघटनेचे नेते व कार्यकर्ते प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. ही पहिली व प्राथमिक बैठक असून यानंतरच्या बैठकीला यापेक्षाही जास्त पक्ष, संघटना व व्यक्तीचा समावेश केला जाईल अशी माहीती ऍड. शीतल चव्हाण यांनी दिली. बैठकीस ऍड. शीतल चव्हाण, हरीश डावरे, एस. के. चेले, रामभाऊ गायकवाड, रविकिरण बनसोडे, दिलीप सुरवसे, प्रदीप जाधव, ऍड. ख्वाजा शेख, राजू बटगिरे, आण्णासाहेब पवार, ऍड. अर्चना जाधव, सत्यनारायण जाधव, धीरज बेळंबकर, राजू भालेराव, प्रदीप चौधरी, मयुरी पैलवान, उत्तम गायकवाड, बाबुराव गायकवाड, संजय कांबळे, सोहेल इनामदार, शबाना उडचणे, प्रदीप चौधरी, यादव माने, किशोर औरादे, करीम शेख, बबीता मदने, रेखा येळनुरे, कविता साळी, बाळासाहेब माने, रोहिदास आदीची उपस्थिती होती.


