कायम जनतेचा नौकर म्हणूनच काम करणार, मालक होण्याचा प्रयत्न करणार नाही – आमदार ज्ञानराज चौगुले

0
60

 

 

उमरगा :- मागील पंधरा वर्षांपासून आपल्या आशिर्वादामुळे उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली या कार्यकाळात मी कधी ही  जनतेचा  मालक होण्याचा प्रयत्न केला नाही.आणि भविष्यात ही  जनतेचा नौकर म्हणूनचं राहणार आहे .असे मी आज आपल्या साक्षीने वचन देतो असे उदगार उमरगा येथील जिल्हा न्यायालय परिसरात दि. 16 रोजी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या भेट दौरा प्रसंगी काढले.
याप्रसंगीआमदार ज्ञानराज चौगुले यांच्या सोबत जिल्हा परिषद धाराशिव चे माजी बांधकाम सभापती ॲड.अभय राजे चालुक्य, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार, माजी सभापती दिलीप गौतम, माजी नगरसेवक धनंजय मुंसाडे,प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक सुनील माने,आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की मी माझ्या  पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या  कार्यकाळात कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही.आणि भविष्यात ही करणार नाही.विनाकारण काही जातीवादी लोक माझ्या संदर्भात चुकीच्या अफवा पसरवत आहेत. अशा भुलथाफा ना बळी पडू नये असे आवाहन ही या प्रसंगी आमदार चौगुले यांनी उपस्थितांना केले. एखाद्या क्षेत्रामध्ये काम करावयाचे असल्यास संबंधित व्यक्तीला त्या क्षेत्राचे अनुभव असने महत्वाचे असते. त्याप्रमाणेच राजकारणात ही अनुभवी व्यक्तीला प्राधान्य दिल्यास त्याचा लाभ नक्कीच त्या मतदारसंघातील परीसराचा विकास करण्याकरीता होतो यात शंका नाही. उमरगा -लोहारा विधान सभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेतील मी अनुभवी उमेदवार आहे.त्यामुळे आपण मतदारांनी धनुष्यबाणाच्या चिन्हा जास्तीत जास्त मतदान करुन मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावे असे आवाहन याप्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले.
महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा येथील विधिज्ञ मंडळाची सदिच्छा भेट घेऊन संवाद साधले यावेळी विधिज्ञांचे मंडळाच्या समस्या जाणून घेतले व आगामी काळात विधीज्ञ मंडळाच्या ज्या काही समस्या असतील ते मी सोडवण्यास कटिबध असल्याचे अभिवचन यावेळेस चौगुले यांनी दिले.
यावेळी. विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. एम.पी .कोथिंबीर,उपाध्यक्ष ॲड.एम.एम. बनसोडे,सचिव ॲड.एस.एस.बिराजदार,कोषाध्यक्ष ॲड.के.एम.पाटील,ॲड.व्ही.एस.आळंगे,ॲड.पी.एल.तोतला,ॲड.बी.जी.माळी,ॲड.जी.के गायकवाड,ॲड.एम.एम.चिंचोलीकर,ॲड.प्रवीण पाटील,ॲड.अक्षय तोतला,ॲड.दिनकर जाधव ,ॲड.प्रभाकर बिराजदार,ॲड.एस.डी.करके,ॲड.अमित सांगवे,ॲड.राहुल जाधव,ॲड.सुशील कुमार शिंदे,ॲड.काशिनाथ राठोड,ॲड.साई टाचले,ॲड. जफर पटेल, आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here