उमरगा:- आगामी निवडणुकांना महायुती म्हणुन सामोरे जाण्याचे पक्षाकडुन आम्हाला आदेश असुन स्थानिक नेत्यांचेही महायुतीला प्राधान्य असणार आहे. परंतु ऐनवेळी काही कारणांमुळे युती नाही झाल्यास कार्यकर्त्यांनी गाफील न राहता स्वबळाचीही तयारी ठेवावी असे आवाहन शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव ॲड.अशोक पटवर्धन यांनी केले. उमरगा व मुरूम नगर परिषदेच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दि.२८ रोजी सायंकाळी शासकीय विश्रामगृह, उमरगा येथे आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.
महायुतीतील वरिष्ठांसोबत चर्चा सुरू :- प्रा.रविंद्र गायकवाड
आगामी निवडणुकीसंदर्भात आमचे जिल्हयातील व तालुक्यातील महायुतीतील सर्व घटकपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असुन यास सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. असे मत प्रा.रविंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले. या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार निवडुन आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रचारादरम्यान सर्व जुने पदाधिकारी व नवीन पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपापसात समन्वय राखुन आपला उमेदवार जास्तीत जास्त मतांनी कसा निवडुन येईल याकडे लक्ष द्यावे अशा सुचनाही यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शिवसेना उपनेते तथा मा.आमदार ज्ञानराज चौगुले, बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, सहसंपर्कप्रमुख भगवान देवकाते, युवती सेना निरीक्षक ॲड.आकांक्षा चौगुले यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा सेना निरीक्षक किरण गायकवाड, सुत्रसंचलन मनोज जाधव व आभार प्रदर्शन भगत माळी यांनी केले.दरम्यान अंबरनगर येथील शिवसैनिक कुमार लक्ष्मण पवार यांची शिवसेना बंजारा सेलच्या मुरुम विभागप्रमुख पदावर निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, जगन्नाथ पाटील, माजी नगरसेवक सिद्रामप्पा चिंचोळे, बालाजी तात्या सुरवसे, विलास येळीकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, विधानसभा संघटक शरद पवार, उमरगा शहरप्रमुख योगेश तपसाळे, मुरूम शहरप्रमुख सुरेश मंगरूळे, माजी नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, महिला आघाडी तालुकाप्रमुख संध्याताई शिंदे, शहरप्रमुख लतातीई भोसले, प्रिती शिंदे, चंद्रशेखर सुर्यवंशी, सुनील औरादकर, युवा सेना तालुकाप्रमुख विनोद कोराळे, शहरप्रमुख अमर शिंदे, संदीप चौगुले, नाना मदनसुरे, राजेंद्र शिंदे, गोपाळ जाधव, राहुल शिंदे, सचिन शिंदे, शहाजी येळीकर, वसीम शेख, डॉ.फरीद अत्तार, आयुब लदाफ, राजु हान्नुरे, प्रा.अंकुश गायकवाड, फुलचंद औरादे, भरत भोसले, शफी चौधरी, रवी अंबुसे, अरुण जगताप, उध्दवबापु मुळे, आदी यावेळी उपस्थित होते.


