नारंगवाडी पाटीजवळ रिफ्लेक्टर नसलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टर ला दुचाकीची धडक ; एक गंभीर जखमी

0
2850

उमरगा:- तालुक्यातील लातूर – उमरगा रोडवरील नारंगवाडी पाटी जवळ रिफ्लेक्टर नसलेला ऊस भरुन उभा असलेला ट्रॅक्टर न दिसल्याने एका दुचाकी चालकाने ट्रॅक्टर ला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला असून,या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 18 रोजी रात्री 8.20 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सविस्तर वृत्त दिनांक 18 रोजी रात्री 8:20 वाजता उमरगा लातुर रोडवर नारंगवाडी पाटीजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर उभा होता ना त्याला रिफ्लेक्टर ,ना मागील बाजूस लाईट तसाच उभा असल्याने उमरगा येथुन लामजना गावाकडे जाणाऱ्या मोटारसायकल  क्रमांक एम.एच. 24 बी.पी. 9046 च्या चालकाला ट्रॅक्टर न दिसल्या मुळे ट्रॅक्टर ला पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकल चालक शफीक हबीब रोजेवाले वय 35 राहणार लामजना हा गंभीर रित्या जखमी झाला आहे.सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थान ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले . असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here