शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग येथे जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती

0
121

उमरगा – तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्टच्या शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, येथे जागतिक एड्स दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन दि. 01 डिसेंबर रोजी करण्यात आले होते.’ओव्हरकमिंग डिस्प्रप्शन ट्रान्सफॉरमिंग द एड्स रिस्पॉन्स’ (व्यत्ययावर मात करणे, एड्स प्रतिसादात परिवर्तन करणे) या यंदाच्या प्रमुख थीमनुसार हा उपक्रम राबवण्यात आला.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बी. एच. बेडादुर्गे, सचिव डॉ.विजय बेडदुर्गे आणि उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश कदारे हे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रियांका विठ्ठल राठोड (कंसल्टंट फिजिओथेरपिस्ट, शासकीय उपजिल्हा रुग्णालय उमरगा) यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सविषयी माहिती दिली. रोगप्रतिबंध, उपचारपद्धती, तसेच एड्सबाबत समाजामध्ये निर्माण होणाऱ्या गैरसमजांचा विशेष ऊहापोह त्यांनी केला.कार्यक्रमात रेड रिबन क्लब तर्फे एचआयव्ही एड्स जागरूकता आणि प्रतिबंध या विषयावर स्कीट/भूमिका सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाट्यरूपांतून एड्सचा प्रसार कसा होतो, प्रतिबंधात्मक उपाययोजना, तसेच संक्रमित व्यक्तींबद्दल समाजाने ठेवावयाची संवेदनशीलता यावर प्रभावी संदेश देण्यात आला. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.महेश कदारे सर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे आरोग्यजागृती वाढीस लागते असे मत व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयात प्राचार्य अल्विन काळे, डॉ.स्नेहल धर्माधिकारी, प्रा.प्रशांत वाघमारे, प्रा.शुभम सूर्यवंशी, प्रा.प्रियंका राठोड, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहबाज शेख प्रा.शुभांगी बंदीछोडे, प्रा.किशोर जाधवर व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता. समाजामध्ये एड्सविषयी भीती नसून माहिती आणि जागरूकता पोहोचणे अत्यंत गरजेचे असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here