उमरगा:- उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरगा, तहसील कार्यालय उमरगा,श्री छत्रपती महाविद्यालय उमरगा,रोटरी क्लब उमरगा व सायकलिस्ट क्लब उमरगा यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री. छत्रपती महाविद्यालय उमरगा येथून दिनांक 17 नंबर 2024 रोजी सकाळी 7.00 वाजता मतदान जनजागृती रॅलीची सुरुवात करण्यात आली. सदर रॅलीतर्फे बस स्टॅन्ड उमरगा येथे एसटी वाहक चालक प्रवाशांना पोम्प्लेट देऊन जनजागृती करून, महादेव गल्ली मार्गे मुख्य बाजारपेठे तसेच शहरातील मुख्य रस्त्याने सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले व रॅली तहसील कार्यालय उमरगा येथे पोहोचल्यावर सायकल रॅलीतील सर्व सहभाग घेणाऱ्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरगा तर्फे केळी व चिक्कीचे वाटप करून समारोप करण्यात आला.
त्या प्रसंगी एजाज पटेल सहाय्यक महसुल अधिकारी उपविभागीय कार्यालय उमरगा, महादेव जाधव, प्रवीण मोठे सहाय्यक महसूल अधिकारी तहसील कार्यालय लोहारा, कोकणे मंडळ अधिकारी, दीपक चव्हाण मंडळाधिकारी,संदीप माचाना मंडळ अधिकारी तसेच छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग विद्यार्थी,रोटरी क्लब व सायकल लिस्ट क्लबचे सदस्य अनिल मदनसुरे सर क्रीडा शिक्षक व राजू बटगिरी शिक्षक,सायकलिस्ट सदस्य बाळू घोडके, बालाजी औरादे, विनोद देवकर, संजय अस्वले, रवी कदेरे. सगर, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ संजय अस्वले सर इतर स्टॉप. रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश साळुंके, सचिव जुगल किशोर, व्यंकट गुंजोटे, मनीष सोनी,
व इतर नागरिक यांनी सहभाग घेतला.