उमरगा : तालुक्यातील मुरुम येथील श्री. विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गळीत हंगाम २०२५-२६ करीता दि.१५ नोव्हेंबर 2025अखेर पर्यंत गाळपासाठी आलेल्या ऊसाचे पहिल्या पंधरवडयाच्या बीलाचा हप्ता प्रती मेट्रीक टन रु.२७००/- प्रमाणे सर्व संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. तरी ऊस उत्पादक शेतकरी बांधवानी बँकेशी संपर्क साधून बिलाची रक्कम घ्यावी.असे आवाहन श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी बसवराज पाटील यांनी केले आहे.
श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना चेअरमन, माजीमंत्री तथा भाजपचे लातूर ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नियोजनबध्द मार्गदर्शनाखाली सुरु असून या हंगामात दि.१५/११/२०२५ अखेर गाळपासाठी आलेल्या ऊसाचे पहिल्या पंधरवडयाचे बीलाचा हप्ता प्र.मे.टन रु.२७००/- प्रमाणे सर्व संबंधितांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. तरी ऊस उत्पादक शेतकरी बांधवानी बँकेशी संपर्क साधून बिलाची रक्कम घ्यावी. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस आपल्या कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे. अशी विनंती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. गवसाणे यांनी केली आहे.


