उमरगा शहर व परिसरातील ‘गुडगुडी’ थांबवून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची ऍड.शितल चव्हाण फाउंडेशनची मागणी 

0
367

उमरगा : उमरगा शहर व परिसरात”गुडगुडी” नावाचा जुगार मोठ्या प्रमाणात फोफावला असून तो तात्काळ बंद करून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्यावतीने उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांना व उमरगा – लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या कार्यालयात दि. 11 डिसेंबर रोजी देण्यात आले.

 

निवेदनात पुढीलप्रमाणे ,यापूर्वी दि. 14/06/2024 व दि.16/04/2025 रोजी उमरगा शहरात ‘गुडगुडी’ हा जुगार सुरु कसल्या संदर्भात चे निवेदन देऊन ही या जुगाराचा प्रकार पूर्णपणे थांबला नसल्याने दि.11/12/2025 रोजी ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनने पुन्हा या विषयाला वाचा फोडली आहे.धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहर व परिसर गुंडगिरी व अवैध धंद्यांचे हब झाले आहे. जुगार, खाजगी सावकारी, अवैध धंदे हे वाढत्या गुन्हेगारीचे प्रमुख कारण आहे.यापूर्वी देखील अनेकवेळा निवेदने देऊन उमरगा शहर व परिसरात सुरु असलेल्या ‘गुडगुडी’ या जुगार प्रकाराकडे, त्यामुळे अनेकांचे संसार बरबाद होत असल्याकडे ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनने पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परिणामत: पूर्वी अनेक ठिकाणी सुरु असलेल्या ‘गुडगुडी’ या जुगार प्रकाराला आळा बसला असला तरी अजूनदेखील उमरगा शहरातील मेन रोडवरून इंदिरा चौकाकडे जाण्याच्या मार्गालगत, ‘प्रभात’ हॉटेलच्या मागील बाजूस ‘गुडगुडी’ व ‘मटका’ अड्डा सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे असे सांगत दि. 11 (गुरुवार) रोजी फाउंडेशनच्या वतीने पुन्हा एकदा पोलीस प्रशासन व आमदार कार्यालयास निवेदन देण्यात आले.’गुडगुडी’ या जुगार प्रकरात अनेकजण वेळ व पैसा वाया घालवतात. त्यातून नैराश्य, कौटुंबिक ताणतणाव, कर्जबाजारीपणा वाढून सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत आहे.अशा परिस्थितीत ‘गुडगुडी’ व ‘मटका’ यासारखे अवैध जुगार प्रकार थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलणे व जुगार प्रकार कायमचे बंद करून संबंधितावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हंटले आहे. निवेदनाची गंभीर्याने दखल घेवून तात्काळ कारवाई सुरु न केल्यास या प्रकारावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.निवेदनावर सत्यनारायण जाधव, ऍड. ख्वाजा शेख, ऍड. अर्चना जाधव, राजू भालेराव, करिम शेख, ज्योती माने, शबाना उडचणे, धानय्या स्वामी, किशोर बसगुंडे, कविता साळी, मुस्कान शेख आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here