उमरगा:- तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचालित शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थ्यांनी दि.18 रोजी एकुरगावाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करुन, आरोग्य शिक्षणां संदर्भात माहिती देण्यात आली.
यावेळी मेडिकल ऑफिसर डॉ.नूर, शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चे प्राचार्य अल्विन काळे, डॉ. स्नेहल धर्माधिकारी, जिल्हा परिषद शाळा एकुर्गावाडी यांचे मुख्याध्यापक रवींद्र चिंचनसुरे, सहशिक्षिका प्रिया भोसले, किशोर श्रीमंत औरादे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी, आरोग्य तपासणी व आरोग्य शिक्षण देण्यात आले या कार्यक्रमाचा उद्देश लहान वयातच आरोग्य समस्या शोधणे आणि उपचार करणे.आरोग्यविषयक सवयी आणि वर्तणूक सुधारणे.रोग प्रतिबंध आणि नियंत्रण करणे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे. हा होता यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी: वजन, उंची, डोळे, दात, त्वचा, कान यांची तपासणी.मानसिक आरोग्य: समुपदेशन आणि मानसिक आरोग्य यावर चर्चा करण्यात आली लसीकरण: आवश्यक लसीकरण वेळापत्रकाचे पालन तपासणे, व वेळोवेळी लसीकरणास सहभाग नोंदवण्यात सांगण्यात आले पोषण: सकस आहार आणि कुपोषणावर लक्ष देणे.स्वच्छता: वैयक्तिक स्वच्छता आणि शाळेतील स्वच्छतेचे महत्त्व शिकवणे.प्रथमोपचार: आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून देणे. तपासणी व आरोग्य शिक्षण करण्यात आली यावेळी शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मार्फत शालेय उपयोगी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. प्राचार्य अलविन काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, मुख्याध्यापक रवींद्र चिंचनसुरे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.


