मुरूम पालिकेवर भाजपचा झेंडा ; नगराध्यक्षपदी भाजपचे बापूराव पाटील विजयी

0
342

मुरूम नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल रविवारी (दि 21) मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आला.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पालिकेवर एकहाती सत्ता काबीज केली असून नगराध्यक्ष पदी भाजपचे उमेदवार बापूराव पाटील विजयी झाले आहेत.नगरसेवक पदासाठीच्या 20 जागांपैकी 19 जागेवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.प्रतिस्पर्धी शिवसेना (उबाठा),राष्ट्रवादी काँग्रेस (अप),शिवसेना (शिंदे) आणि काँग्रेस पक्ष सत्ता काबीज करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत.

मुरूम पालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून माजी मंत्री बसवराज पाटील यांची एकहाती सत्ता राहिली आहे.बसवराज पाटील भाजपात गेल्याने मुरूम पालिका निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.या निवडणुकीत भाजपकडून त्यांचे बंधू तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील हे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत होते.या निवडणुकीत बापूराव पाटील यांना 6862 मते पडली आहेत.त्यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवाराचा तब्बल 4019 मतांनी पराभव केला आहे.या बरोबरच नगरसेवक पदाच्या 20 पैकी 19 जागेवर भाजपचे तर एका जागेवर उबाठा पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे.मुरूमच्या जनतेनी पुन्हा एकदा बसवराज पाटील आणि बापूराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत भाजपच्या हाती एकहाती सत्ता सोपवल्याने पालिकेवर पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकला आहे.निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.

*भाजपचे विजयी नगरसेवक*

1)स्नेहा बंडगर

2)अमर भोसगे

3)सचिन फनेपुरे

4)श्रीदेवी दुर्गे

5) महादेवी बनसोडे

6)अहमद मनीयार

7)निखिता अंबुसे

8)नीरजानंद अंबर

9)गौस शेख

10)निर्मला कंटेकुरे

11) रुपचंद गायकवाड

12) मुमताजबी ढोबळे

13) ज्योती शेळके

14) रमेश चव्हाण

15)सुनीता बने

16)राजेंद्र बेंडकाळे

17)समीना मुल्ला

18)रागिणी गायकवाड

19)सिद्धराया ख्याडे

*शिवसेना उबाठा*

1) अजित चौधरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here