उमरगा:- शहरातील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डॉ .विजय बेडदुर्गे यांच्या शिवाई हॉस्पिटल मध्ये ऑस्ट्रेलिया येथे कार्यरत असलेले मेंदू रोग तज्ञ डॉ. बालाजी कळबंड यांचे रविवार दिनांक 28 रोजी एक दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष बरगली बेडदुर्गे ,डॉ.बालाजी कळबंड ,डॉ.प्रज्ञा बनसोडे,डॉ.विजय बेडदुर्गे ,डॉ.सचिन शेंडगे ,डॉ.सारिका बेडदुर्गे ,अशोक दूधभाते ,गोरख घोडके ,विठ्ठल माने ,धनंजय बेडदुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.या शिबिरात झटके येणे , मिरगी, अर्धांगवायू, कंपवात, अर्ध डोकेदुखी, पक्षाघात, गतीविकार, स्मृतीभ्रंश इ. अनुवंशिक व इतर क्लिष्ट मेंदू रोगा संदर्भात तपासणी व उपचार करण्यात आले.यावेळी 50 रुग्णाची तपासणी करण्यात आली. शिबीरात आर्थिक अडचण असलेल्या व्यक्तींकरिता हे शुल्क तपासणी उपरांत पूर्णपणे माफ करण्यात आले .जमा होणारी सर्व रक्कम सार्थ फाउंडेशन लातूर ला देण्यात आली. शिबिराचे प्रास्ताविक डॉ.विजय बेडदुर्गे यांनी केले तर सूत्रसंचालन गोरख घोडके यांनी केले.शिबिरात शहर व परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


