अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांची पेठ सांगवी येथील विविध ठिकाणच्या प्रक्षेत्रांना भेट

0
180

उमरगा:- तालुक्यातील पेठ सांगवी येथील कृषी विभागा अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या विविध ठिकाणच्या प्रक्षेत्रांना धाराशिव चे अधिक्षक कृषि अधिकारी राजकुमार मोरे,तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापूरे यांनी दिनांक 10 रोजी भेट दिली.

 

दिनांक 10 रोजी मौजे पेठसांगवी येथे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी धाराशिव  राजकुमार मोरे  यांनी पेठ सांगवी येथे विविध ठिकाणी प्रक्षेत्र भेट दिली .यामध्ये उर्मिला ज्ञानराज देशमुख यांच्या शेतावर तुती लागवड पाहणी करण्यात करुन  शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  तुतीची लागवड करावी असे आवाहन याप्रसंगी केले.दरम्यान  संतोष बाळासाहेब पाटील यांच्या ट्रॅक्टर ची तपासणी करण्यात आली. तसेच समुद्राळ येथे ट्रॅक्टर ,रोटावेटर  तपासणी करण्यात आली.याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे , तालुका कृषी अधिकारी  ज्ञानोबा रीतापुरे ,मंडळ कृषी अधिकारी एस.टी.शिंदे, उप कृषि अधिकारी एल.व्ही.फडणीस सहाय्यक कृषी अधिकारी रमेश पाटील , अमोल बलसुरे ,अनिल कुंभार, बळीराम जाधव , हनुमंत बिराजदार, सरपंच प्रतिनिधी शब्बीर मुजावर, शेतकरी ज्ञानराज देशमुख, तिपय्या स्वामी रोजगार सेवक, अमर भुरे, गहिनीनाथ कोकाटे आदी शेतकरी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here