उमरगा:- तालुक्यातील मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना येथील सर्व कामगार व कर्मचारी यांनी आपल्या पाल्याचे शिष्यवृत्ती फाॅर्म 31 जानेवारी पर्यंत भरुन घ्यावे असे आवाहन कारखाना कामगार प्रशासनाच्या वतीने दि.15 रोजी एका प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
कारखान्यातील सर्व कर्मचारी व कामगार यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळचे ऑनलाईन शिष्यवृत्ती फॉर्म भरणे चालु झाले असून, ज्यांचे पाल्य नववी (९) वी पास किंवा त्यापुढील वर्गात शिकत असतील अशा कर्मचारी व कामगांराने आपल्या पाल्यांचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे ऑनलाईन शिष्यवृत्ती फॉर्म भरुन घ्यावे शिष्यवृत्ती फार्म भरणे अंतिम दिनांक ३१/०१/२०२६ आहे. शिष्यवृत्ती फाॅर्म भरण्या करीता
खालील कागदपत्र (मुळप्रत) लागणार आहेत.
१ मागील वर्षाचे गुणपत्रिका
२ चालु वर्गात शिकत असलेले बोनाफाईची मुळप्रत
३ रेशन कार्ड किंवा ग्रामपंचायतीचे वारस प्रमाणपत्र
४ स्वतःचे व मुलाचे पासपोर्टसाईजचा एक फोटो
५ मुलाचे राष्ट्रीकृत बँकेचे पासबुक
६ स्वतःचे व पाल्याचे आधारकार्ड
तरी वरील शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी घ्यावेत. असे आवाहन कारखाना हेड टाईम किपर यांनी केले आहे.


