धाराशिव :- जिल्ह्यातील 8 पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक दि. 9 फेब्रुवारी रोजी झालेली आहे. राज्यशासनाच्या अधिसुचनेनुसार धाराशिव जिल्हयातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, भूम व परंडा येथील पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत दि.०९.१०.२०२५ रोजी घेण्यात आलेली आहे. निर्वाचित सदस्यामधुन महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या आधिनियम १९६१ मधील कलम ५९ (३) मधील तरतुदीनुसार, तसेच राज्यशासनाच्या आदेशा अन्वये दिलेल्या सुचनांप्रमाणे दि.06 मार्च रोजी सभापती व उपसभापती यांची निवडणुक संबंधित पंचायत समितीच्या सभागृहामध्ये खालील नमुद वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहे. या संदर्भातची माहिती एका प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून धाराशिव जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आधिनियम १९६१ मधील कलम ५९ (३) व ६७ (३) तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापती) व पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणुका) नियम १९६२ मधील २ ब नुसार किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी धाराशिव यांनी प्रत्येक पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीकरीता घ्यावयाच्या विशेष सभेच्या बैठकीसाठी खालील परिशिष्टात दर्शविल्याप्रमाणे प्रत्येक पंचायत समितीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून याद्वारे नियुक्ती करीत आहे.
पंचायत समितीचे नाव
पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत केलेले अधिकारी यांचे नाव व पदनाम
सभापती पदाच्या आरक्षणाचा तपशील
धाराशिव पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण (महिला) करीता राखीव असून,धाराशिव चे उपविभागीय अधिकारी,ओंकार देशमुख हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.,
तुळजापूर पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण करीता राखीव असून पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.)चे प्रविण धरमकर हे काम पाहणार आहेत.
उमरगा पंचायत समिती सभापती पद अनुसुचित जाती करीता राखीव असून, उमरगा चे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे हे पिठासीन अधिकारी काम पाहणार आहेत
लोहारा पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग या करिता राखीव असून , धाराशिवीचे पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड हे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत,
कळंब पंचायत समिती चे सभापती सर्वसाधारण महिला करिता राखीव असून कळंब चे उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे हे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.,
वाशी पंचायत समितीच्या सभापती चे आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला करिता असून पिठासीन अधिकारी म्हणून धाराशिवीचे भूसंपादन माध्यम प्रकल्प चे उपजिल्हाधिकारी संतोष राऊत हे काम पाहणार आहेत.,
भूम पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण असून भूमीचे उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे हे पिठासिन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत
परंडा पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण सर्वसाधारण महिलेकरिता असून, धाराशिव चे भूसंपादन गांजरा प्रकल्प चे उपजिल्हाधिकारी श्रीकांत पाटील हे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
पीठासीन अधिकारी यांनी दि.०६.०३.२०२६, रोजी होणा-या विशेष सभेस उपस्थित राहण्यासाठी पंचायत समित्तीच्या सर्व निर्वाचीत सदस्यांना विहित नमुन्यातील नोटीसांची नियमाप्रमाणे मुदतीच्या आत बजावणी कराची.
बैठकीची कार्यक्रम पत्रिका खालील प्रमाणे आहे.
दिनांक 06 मार्च 2026,स,१०,०० ते १२.०० पर्यंत
सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्देशनपत्र स्विकारणे
दुपारी ०२.००
सभेस सुरुवात करणे. उक्त सभा खालील प्रमाणे पार पडेल
दुपारी ०२.०० ते ०२.१५
सभापती व उपसभापती पदासाठी प्राप्त नामनिर्देशनपत्राची तपासणी
दुपारी ०२.१५
नामनिर्देशनपत्राची छाननी
दुपारी ०२.१५ ते ०२.३०
वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची नावे वाचुन दाखवणे.
दुपारी ०२.३५ वा.
उमेदवारी परत घेणे.
दुपारी ०२.४० वा.
उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवारांची नावे वाचुन दाखवणे.
दुपारी ०२.४० ते कामकाज संपेपर्यंत
निवडणूक लढविणा-या उमेदवारांची नावे वाचुन दाखवणे.,आवश्यक असल्यास मतदान, प्रथम सभापती पदासाठी व नंतर उपसभापती पदासाठी.
, निवडणूकीचा निकाल जाहीर करणे.
उपरोक्त कार्यक्रमानुसार प्रथम सभापतीपदाची निवडणुक घेण्यात येईल, व त्यानंतर लगेच त्याच पध्दतीचा अवलंब करून उपसभापती पदाची निवडणुक घ्यावी. सभेचा इतिवृत्तांत त्याच वेळी पुर्ण करुन पंचायत समितीच्या इतिवृत नोंदवहीमध्ये अभिलेखित करावा. इतिवृत्ताची प्रमाणीत प्रत त्याच दिवशी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. वरील सर्व बाबीसाठी लागणारी सर्व आवश्यक व्यवस्था संबंधित तहसिलदार व गटविकास अधिकारी वर्ग-१, पंचायत समिती त्यांनी उपलब्ध ठेवावी. असे आदेश धाराशीवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमाने माहिती दिली आहे.


