उमरगा :- शहरापासून जवळच असलेल्या सोलापूर – हैदराबाद महामार्गावर भरधाव कारचे टायर फुटून वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजू असलेल्या चहाच्या दुकानातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले असल्याची घटना मंगळवार दि. 10 रोजी दुपारी घडली आहे.
सविस्तर वृत तेलंगणा राज्यातील परिवार तुळजापूर तालुक्यातील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन परत आपल्या गावी जात असताना उमरगा चौरस्ता जवळील भारत टायर जवळ अचानक कार क्रमांक टि.एस. 34 एफ 4706 या भरधाव कारचे टायर फुटल्यामुळे वाहनावरील वाहन चालकाचा ताबा सुटून महामार्गाच्या बाजूस असलेल्या चहाच्या स्टॉलवर चहा घेत बसलेल्यांना जोराची धडक दिल्यामुळे दोघे गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली आहे
या भीषण अपघाता मध्ये उमरगा येथील माजी नगरसेवक बळीराम पवार व जनता अर्थमुव्हर्स चे मालक लाडनशहा मुर्शद या दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी सांगितले आहे.तर सचिन भीमराव कुटार (२८) आणि हॉटेल चालक महादेव देडे (३०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर काहींनी कार आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून वेळीच धाव घेतल्याने त्यांचे प्राण वाचले.
या भीषण अपघातात संबंधिताचा नाहक मृत्यू झाल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


