निसर्गरम्य परिसरातील भीम पार्क डोळ्यांचे पारणे फेडणार! आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून १५ कोटी निधी मंजूर, विपश्यना केंद्र, आंबेडकर संग्रहालयाची उभारणी

0
53

 

 

 

उमरगा :- तालुक्यातील कराळी येथील निसर्गरम्य परिसरात ‘भीम पार्क’ची उभारणी केली जात आहे. त्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सरकारकडून १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. या निसर्गरम्य परिसरात विपश्यना केंद्र आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयही उभारण्यात येणार आहे.
कर्नाटक सीमेलगतच्या या परिसरात ‘दी लॉर्ड बुद्धा रिलीजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट’ने ५ एकरांमध्ये बुद्धविहाराची उभारणी केली आहे. त्याच ठिकाणी आमदार चौगुले यांनी सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाकडून भीम पार्कसाठी २०२३ मध्येच १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीसाठी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवला होता. आता भीम पार्कचे काम सुरू झाले आहे.या निधीतून बुद्ध विहार आणि भीम पार्क परिसरासाठी संरक्षक भींत बांधण्यात येणार आहे. भीम पार्कमध्ये धम्मकुटी, विपश्यना केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाचा समावेश आहे. अंतर्गत रस्ते, पादचारी मार्गाची बांधणी केली जाणार आहे. बगीचाही असेल, वाहनतळाचीही सोय केली जाणार आहे. हे भीम पार्क अत्याधुनिक असेल. सीसीटीव्ही कॅमेऱेही बसवण्यात येणार आहेत.

सालेगावात आंबेडकर स्मारकासाठी ११ कोटी मंजूर
सालेगाव (ता. लोहारा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी निधी मिळावा, यासाठी आमदार ज्ञानराजे चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता.या स्मारकासाठी १४ कोटी ७२ लाख रुपये खर्चाचा आराखडा सादर करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ५ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी आमदार चौगुले यांनी मिळवून दिला आहे. उर्वरित निधीसाठीही त्यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. आतापर्यंत एकूण ११ कोटी रुपयांचा निधी आमदार चौगुले यांनी मंजूर करुन घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here