उत्पादन शुल्क विभागाची हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त,२९ गुन्ह्यांची नोंद ; २९ आरोपींना अटक

0
137

 शुल्कची हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त,२९ गुन्ह्यांची नोंद ; २९ आरोपींना अटक

धाराशिव :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ ची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. आदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क धाराशिव कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी अवैध मद्य निर्मिती,वाहतूक व विक्री इत्यादीवर पूर्ण प्रतिबंध करण्याकरिता कठोर कारवाई करण्यात येत आहे.१७ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या दोन दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई केली.यामध्ये ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व २९ गुन्ह्याची नोंद करून २९ आरोपींना अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाराशिवचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ते १८ नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक विभाग धाराशिव व अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांनी जिल्हयात केलेल्या कारवाईमध्ये एकूण २९ गुन्हयांची नोंद करून २९ आरोपीला अटक केली आहे.या कारवाईमध्ये देशी दारु ३१७.३५ ब.लि विदेशी दारु २४४.२९ ब लि.हातभट्टी दारु तयार करण्यासाठी रसायन १५०० लि. ४७० लि.हाटभट्टी दारु,१२८.१८ ली. बिअर (एकूण अंदाजित किंमत रु. ३५ लक्ष १० हजार ९१० रु.) जप्त करण्यात आली आहे . दिनांक १७ ते १८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक विभाग धाराशिव व अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांनी जिल्हयात केलेल्या कारवाईमध्ये एकूण ४ गुन्हयांची नोंद केली असून ४आरोपीला अटक केली आहे.या कारवाईमध्ये २ वाहने जप्त करण्यात आली आहे .या कारवाईमध्ये देशी दारु २४१.८३ ब . लि.,विदेशी दारु ९८.५५ ब.लि. , बिअर २२.८८ ब.लि.व गोवा निर्मित विदेशी मद्य २६ .२८ लि.( एकूण अंदाजित किंमत १७,५८,६३०/ – ) जप्त करण्यात आली आहे . निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भूम विभाग व अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांनी भुम,परांडा व वाशी या तालुक्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये एकूण ५ गुन्हयांची नोंद केली असून , ५ आरोपीला अटक केली आहे . सदरील कारवाईमध्ये देशी दारु ८.६४ ब.ली. व विदेशी दारु १६.२ ब.लि हातभट्टी दारु ५५ लिटर व रसायन ५०० लिटर ( एकूण अंदाजित किंमत रु.४३,००० / – ) जप्त करुन नष्ट करण्यात आली आहे . निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क धाराशिव विभाग व अधिनस्त कर्मचारी यांनी धाराशिव व कळंब या तालुक्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये एकूण ८ गुन्हयांची नोंद केली असून , ८ आरोपीला अटक केली आहे.या कारवाईमध्ये ५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.कारवाईमध्ये हातभट्टी दारु ५० व. ली.व हातभटी दारु निर्मिती करता वापरण्यात येणारे रसायन १००० ब . लि . , देशी दारु ३६.६४ ब.ली.व विदेशी दारु ६०.५२ व.लि.( एकूण अंदाजित किंमत रु . १२,५१,७७० / – ) जप्त करुन नष्ट करण्यात आले आहे . दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिमा तपासणी नाका तलमोड विभाग व अधिनस्त कर्मचारी यांनी उमरगा तालुक्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये २ गुन्हयांची नोंद केली असून,२ आरोपीला अटक केली आहे . सदरील कारवाईमध्ये वाहन जप्त करण्यात आलेले आहे.या कारवाईमध्ये हातभट्टी दारु ७० ब . लि.व विदेशी दारु ८.६४ ब.लिटर ( एकूण अंदाजित किंमत रु . ७५,०८० / – ) जप्त करुन नष्ट करण्यात आली आहे . निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तुळजापूर विभाग व अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांनी तुळजापूर व उमरगा या तालुक्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये एकूण १० गुन्हयांची नोंद केली असून १० आरोपीला अटक केली आहे.या कारवाईमध्ये ५ वाहने जप्त करण्यात आलेली आहे.या कारवाईमध्ये बिअर १०५.३० ब.ली.विदेशी दारु ३३.२८ ब.ली.हातभट्टी दारु,व ब.लिटर व देशी दारु ३०.२४ ब . लिटर ( एकूण अंदाजित किंमत रु.३,८२,४३० / – ) जप्त करुन नष्ट करण्यात आली आहे . १७ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवायामध्ये एकूण २९ गुन्हे नोंद करुन २९ आरोपींना अटक केलेली आहे.या कारवाईमध्ये एकूण १३ वाहने जप्त करण्यात आली आहे.कारवायात हातभटी दारु निर्मिती करता वापरण्यात येणारे १५०० लि.रसायन,४७० लि . हातभट्टी दारु,३१७.३५ लि.देशी दारु , २४४.२९ लि.विदेशी व २२८.१८ लि . बिअर जप्त करण्यात येऊन नष्ट केली असून याची अंदाजित किंमत ३५,१०,९१० / – इतकी आहे. दिनांक १५/१०/२०२४ रोजी आदर्श आचारसंहिता सुरु झाल्यापासून दिनांक १८/११/२०२४ पर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये एकूण २७० गुन्हयांची नोंद करुन २५६ आरोपींना अटक केली आहे. एकूण २७ वाहनांसह रुपये ८१.७८ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून अवैध मद्य निर्मिती,वाहतूक व विक्री इत्यादींवर कठोर कारवाई करण्यात येत असून अवैध मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल्स / ढाब्याबाबत माहिती असल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती,वाहतूक व विक्रीची माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील टोल फी क्रमांक १८००२३३९९९९ अथवा व्हॉटस् अॅप क्रमांक ८४२२००११३३ वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.असे राज्य उत्पादन शुक्लचे अधीक्षक गणेश बारगजे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here