- उमरगा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांनी बजाविला मतदानाचा अधिकार
उमरगा:- उमरगा- लोहारा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि.20 नोव्हेंबर रोजी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू असून, मतदारसंघातील प्रमुख नेत्यांनी मतदान करून त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे.
उमरगा येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सपत्नी मतदानाचा हक्क बजावला तर मुरूम येथे उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील यांनी सपत्नी मतदानाचा हक्क बजावला याप्रसंगी श्वेता बापूराव पाटील ,माजी पंचायत समिती सभापती सचिन पाटील, मुरूम नगरीचे माजी नगरसेवक गौस शेख, राजू मुल्ला ,आदी मान्यवर यांनी मतदानाचा हक्क बजावला.