उमरगा :- शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी, कोरेगाववाडी येथे दि.26 रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी.एच.बेडदुर्गे होते. संस्थेचे सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. बी.फार्मसी व डी.फार्मसी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील पहिल्या दिवसापासूनच आपले ध्येय ठरवून त्या दिशेने योग्य वाटचाल करावी. विद्यार्थी जीवनात अथक परिश्रम व त्याला आधुनिक कौशल्याची जोड देऊन यशस्वी व्हावे असे डॉ.विजय बेडदुर्गे यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्व भौतिक सुविधा पुरवण्यासाठी महाविद्यालय कटीबद्ध असून विद्यार्थ्यांनी एकलव्याप्रमाणे निष्ठेने विद्यार्जन करावे व भवितव्य उज्ज्वल करावे असे संस्थेचे अध्यक्ष बी.एच.बेडदुर्गे यांनी मार्गदर्शन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पालक विद्यार्थी यांच्या समस्यांचे निवारण करण्यात आले. महाविद्यालयीन परिसर अतिशय सुंदर, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अनुकूल असल्याचा पालकांनी अभिप्राय दिला. प्रास्ताविक प्राचार्य महेश कदारे यांनी केले.यावेळी प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, डॉ.अश्विनी सूर्यवंशी, प्रा.फुलचंद काजळे, प्रा.श्रीकृष्ण मुळे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शीतल शेळके, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.वैष्णवी फुगटे, प्रा.प्राजक्ता ननावरे, प्रा.प्रिया धोंडगे, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनश्री भुजंगे व आभार प्रा. संतोष जखोटीया यांनी मानले.