आमदार प्रविण स्वामी यांची वीज वितरण सबस्टेशन येणेगूर ला भेट
उमरगा : उमरगा-लोहारा मतदार संघाचे नुतन आमदार प्रविण स्वामी यांनी बुधवारी (ता.चार) रोजी एमएसईबी सबस्टेशन कार्यालय येणेगूर येथे भेट घेतली तसेच येणेगुर पोलीस ठाणे व पशू संवर्धन कार्यालय भेट देऊन त्यांच्यासमोर जागरीकांच्या समस्या मांडल्या. येणेगुर भागातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून विजेच्या समस्यांना तोंड दयावे लागत आहे. शेतकऱ्यांनी विज व पशुसंवर्धनाशी संमंधीत प्रश्न घेऊन आमदार स्वामी यांची भेट घेऊन समस्या मांडल्या होत्या त्यामुळे आमदार प्रविण स्वामी यांनी शेतकऱ्यांसह येणेगुर एमएसईबी सबस्टेशन व पशुसंवर्धन कार्यालयास भेट देऊन चर्चा केली. व डीपीचा मोठा प्रश्न त्भेडसावत आहे येथील कर्मचारी पंकज घंटे यांना योग्य त्या सुचना दिल्या. यावेळी नेताजी कवठे, शेतकरी माधव माडकर,व्यंकट चव्हाण, दीपक हिपर्गे,सतीश पाटील ,अविनाश माळी ,सुधीर शिंदे,बालाजी जामगे , बळीराम जामगे,आकाश शिंदे,अमोल माकने , गोविंद माकने यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.