कोरेगाववाडी येथील काॅलेज ऑफ फार्मसी येथे जीपॅट परीक्षा मार्गदर्शन

0
52

 

उमरगा :-  तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी येथे दि.06 रोजी जीपॅट परीक्षा मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

 

 


प्रमुख मार्गदर्शक म्हणून उमरगा येथील औषधनिर्माण अधिकारी उन्नती खरे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे होते. संस्थेचे सचिव डॉ.विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उन्नती खरे यांनी विदयार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षा विषयी सखोल माहिती दिली.  या स्पर्धाची तयारी जोमाने करावी. संबंधित विविध विषयातील पुस्तके यांचा अभ्यास करावा असे यावेळी त्या म्हणाल्या. यावेळी  प्राचार्य महेश कदारे, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, डॉ.अश्विनी सूर्यवंशी, प्रा.फुलचंद काजळे, प्रा.श्रीकृष्ण मुळे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शीतल शेळके, प्रा.प्रिया धोंडगे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.धनश्री भुजंगे यांनी केले व आभार प्रा. अंकिता यादव यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here