उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांची केसरजवळगा येथील शाळेस भेट

0
632

 

 

उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांची केसरजवळगा येथील शाळेस भेट

उमरगा :- तालुक्यातील केसर जवळगा येथील महात्मा गांधी विद्यालयात रक्तवर्धक गोळ्या घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ व उलटीचा त्रास झाल्याची घटना घडली. यानंतर आज आमदार प्रवीण स्वामी यांनी शाळेस भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि पालक, शिक्षक व प्रशासनाला पुढील सूचना दिल्या:विद्यार्थ्यांनी रिकाम्या पोटी गोळ्या घेऊ नयेत.पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना व चौकशी करावी.प्रवीण स्वामी यांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांना दिलासा दिला आणि प्रशासनाला या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.

विद्यार्थ्याचे चेहरे हास्याने फुलले
यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले, आमदार गुरुजींनी मुलांना हसतखेळत अधिक अभ्यास करून संस्थेचे नाव नावारूपास आणण्याचे वचन घेतले, तसेच मुरूम ग्रामीण रुग्णालयातील एका विद्यार्थ्यालाही भेट देत त्याची प्रकृती विचारण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष बसवराज वरनाळे, मुख्याध्यापक डी. एस. कुलकर्णी, तंटामुक्त अध्यक्ष शब्बीर इनामदार, माजी सरपंच अमोल पटवारी आदी ग्रामस्थ व शिक्षक  उपस्थित होते.

आमदार प्रवीण स्वामी यांच्या शाळा भेटीमुळे विद्यार्थ्यांचे व पालकांचे मनोबल उंचावले आहे, प्रशासनाचा सहकार्याने अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी आवश्यक पावले उचलली जातील..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here