उमरगा :- तालुक्यातील बाबळसूर पाटी जवळ दि. 12 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास लातूरहून उमरग्याकडे येणारी मोटार सायकल क्रमांक MH24 BH6936 वरुन जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने मोटार सायकल खड्यात पडुन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेल्याचे नाव भोसगे नागेश राजशेखर वय 40 वर्ष राहणार शासकीय विश्रामगृह उमरगा असे आहे.
सदर आपघाताची माहीत फोन करून मीळाताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णवाहीका चालक लवटे यांनी दिली.