लोहारा :- भारतीय जनता पार्टी परंडा ग्रामीण मंडळाध्यक्षपदी अरविंद बाप्पा रगडे व परांडा शहर मंडल अध्यक्ष पदी उमाकांत गोरे यांची निवड करण्यात आली.यावेळी भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी या दोघांचा सत्कार करुण शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा धाराशिव जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, भाजपा धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे,भाजपा माजी तालुकाध्यक्ष अॅड गणेश खरसडे,भाजपा अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड.जहीरभाई चौधरी, युवा मोर्चा धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सारंग घोगरे ,पत्रकार निशिकांत क्षीरसागर, मुसळे आप्पा, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस किरण कवटे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.