उमरगा शहर मंडल भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. साईराज टाचले यांची निवड

0
176

उमरगा : – भारतीय जनता पक्ष उमरगा शहर मंडलाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. साईराज टाचले यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नव्या नेतृत्वाकडून पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.या वेळी निवडणूक अधिकारी तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. कपिल महाजन, कैलास शिंदे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा विधी आघाडीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सुशीलकुमार शिंदे, सिद्धेश्वर माने, संतोष वकारे, संजय कोथळीकर, समर्थ दंडगे, अजिंक्य कांबळे, अजय पतंगे, संजीव विभुते, श्रीधर ढगे, आकाश चव्हाण यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.नवीन शहराध्यक्ष अ‍ॅड. साईराज टाचले यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि हार घालून सत्कार करण्यात आला. या निवडीनंतर बोलताना त्यांनी संघटन बळकट करून पक्षवाढीच्या दिशेने कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here