बलसूर येथील मुस्लिम बांधवाच्यावतीने पाणी वाटप 

0
269

उमरगा : तालुक्यातील बलसूर येथून दि.27 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथील आजाद मैदान येथे होणाऱ्या मराठा आरक्षण मोर्चासाठी बलसूर येथील मराठा बांधव रवाना झाले. या प्रसंगी येथील मुस्लिम बांधव,राहत चॅरिटेबल ट्रस्ट उमरगा यांच्यावतीने पाणी वाटप करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष – सत्यनारायण जाधव, उपसरपंच – अय्यूब पटेल, ग्रामपंचायत सदस्य – पवन पाटील, सुधीर नांगरें, चंद्रकांत भोसले, सुरेश साळुंखे, अलीम आत्तार, नासिर आत्तार, जाकिर आत्तार, मन्सूर शेख, आयूब आत्तार, सैपन फकीर, अल्ताफ शेख, मुबारक शेख, दस्तगीर शेख, बिलाल शेख आणि शरीफ शेख आदी ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here